आता पालगड ग्रामपंचायतीचे सर्व निर्णय, विकास कामे, शासकीय योजना आणि नागरिक सेवा — सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध!
पालगड हे रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यात असलेले एक गाव आहे, जे साने गुरुजींचे जन्मस्थान म्हणुन प्रसिद्ध आहे; या गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पालघर किल्ला आहे . हा किल्ला दापोली-खेड रस्त्यावर , दाट जंगलात आहे, तसेच तेथे साने गुरुजींचे स्मारक आहे.
पालगड हे गाव साने गुरुजींच्या आठवणींशी जोडलेले ऐतिहासिक पालगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले एक शांत गाव आहे .
पालगड
०१/०६/१९४१
१५२५.२६ हेक्टर
दापोली
रत्नागिरी
२९५९
१४५०
१५०९
१०७८
२६५२
१०२९.४४ हेक्टर
१६१.२९ हेक्टर
१५०
०६
05
१
१
१
980
१३
०७
००
४०
२९
ग्रामपंचायत स्तरावर सर्वांगीण, समावेशक व शाश्वत विकास साधणे हा आमचा दृष्टीकोन आहे. पारदर्शक प्रशासन, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून गावाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे, तसेच प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा व सन्मानजनक जीवनमान उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिक-केंद्रित, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे हे आमचे मिशन आहे. मूलभूत सुविधा सक्षम करणे, शिक्षण व आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे, महिला-युवकांचा सहभाग वाढवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सेवा सुलभ व प्रभावी करून गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधणे.
पालगड ग्रामपंचायतीतर्फे नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबवल्या जातात.
या योजनांमधून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती विकास, जलसंधारण, स्वच्छता आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांत गावाचा विकास साधला जातो.

श्री. देवेंद्र फडणवीस

श्री. एकनाथ शिंदे

श्रीमती सुनेत्रा पवार

अनिल कृष्णा बेलोसे.

गजानन महादेव दळवी

श्री. जगन्नाथ वासुदेव झोडपे
पालगडग्रामपंचायत आपल्या नागरिकांना विविध मूलभूत सुविधा आणि शासकीय सेवा पारदर्शक, कार्यक्षम आणि जबाबदार पद्धतीने पुरवते.
ग्रामपंचायतचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत आवश्यक सेवा वेळेवर पोहोचवणे आणि गावाचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे.
प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ, सुरक्षित आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी नियमित पाणीपुरवठा योजना राबवते. पाणी साठवण, वितरण आणि टाक्यांची स्वच्छता या सर्व बाबींची नियमित देखरेख केली जाते.
गावात दररोज कचरा संकलन, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहिमा राबवून ग्रामपंचायत स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण राखते.
गावातील शाळांची पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक स्पर्धा, शालेय साहित्य वितरण व बालसंवर्धन उपक्रम राबवले जातात.
गावातील स्मशानभूमीत स्वच्छता, पाणीपुरवठा आणि विजेची व्यवस्था सुनिश्चित केली जाते. अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा आणि शांत वातावरण राखण्यासाठी नियमित देखभाल केली जाते.
आपत्ती किंवा आग लागल्यास ग्रामपंचायत त्वरित प्रतिसाद देऊन बचावकार्य राबवते. ग्रामपातळीवर अग्निशमन साधनांची उपलब्धता आणि प्राथमिक उपचार सुविधा ठेवण्यात आलेल्या आहेत.
ग्रामपंचायत कार्यालयात जन्म, विवाह आणि मृत्यू नोंदणी अधिकृत आणि पारदर्शक पद्धतीने केली जाते. नागरिकांना या सर्व सेवांसाठी त्वरित प्रमाणपत्रे आणि आवश्यक कागदपत्रे मिळतात.